साटेली – भेडशी भोमवाडी येथील घटना
(साटेली भेडशी प्रतिनिधी)
साटेली भेडशी भोमवाडी येथील कालव्यात स्कॉर्पिओ गाडीला अपघात होत गाडी थेट कालव्यात जात गाडीतील एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी मध्यरात्री घडली.या अपघातानंतर स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही स्कॉर्पिओ गाडी ही साटेली- भेडशी भोमवाडी लगतच्या गावातील असून या गाडीत दोघेजण होते. अपघातानंतर स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही गाडी कुडासेच्या दिशेने जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच्या कालवा कॉजवेला धडकली व थेट कालव्यात गेली.यावेळी गाडीत असणाऱ्या महिलेला गंभीरपणे दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला तर चालक किरकोळ जखमी झाला आहे.









