कडोली उपविजेता, वसंत शहापूरकर मालिकावीर, राकेश असलकर सामनावीर
बेळगाव : कंग्राळी के. एच. बेळगाव आयोजित 19 व्या मराठा साम्राज्य चषक भव्य हाफ पिच क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ संघाने बालाजी स्पोर्ट्स कडोली संघाचा 43 धावांनी पराभव करुन मराठा साम्राज्य चषक पटकाविला. अंतिम सामना हा दोन डावामध्ये खेळविण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना एस.आर.एस हिंदुस्थान संघाने 5 षटकामध्ये 3 गडी बाद 39 धावा जमविल्या, या धावांचा पाठलाग करत असताना बालाजी स्पोर्ट्स कडोली या संघाने 5 षटकात 7 गडी बाद 23 धावा जमविल्याने एस. आर. एस. हिंदुस्थान संघाने 16 धावांची आघाडी घेतली.
दुसऱ्या डावात फलंदाजी करताना एस.आर.एस हिंदुस्थान संघाने 5 षटकामध्ये 3 गडी बाद 53 धावा जमविल्या 70 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बालाजी स्पोर्ट्स कडोलीने संघाने 5 षटकात 5 गडी बाद 27 धावाच जमविल्या व एस. आर. एस. हिंदुस्थान संघाने 43 धावांनी विजय मिळवत मराठा साम्राज्य चषकावर आपले नाव कोरले. सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरणात राकेश पाटील, प्रशांत पाटील, दर्शन पाटील, प्रशांत निलजकर, कल्लाप्पा पाटील, विनायक कम्मार, निखिल पाटील, कल्लाप्पा अष्टेकर या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत विजेत्या एसआरएस हिंदुस्थान संघाला व उपविजेत्या बालाजी स्पोर्ट्स कडोली संघाला चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्याचा सामनावीर राकेश असलकर, उत्कृष्ट फलंदाज सुशांत बालाजी स्पोर्ट्स कडोली, उत्कृष्ट गोलंदाज अभी कडोली, मालिकावीर वसंत शहापूरकर एसआरएस हिंदुस्थान यांना चषक देऊन गौरविण्यात आले.









