वृत्तसंस्था/ हैदराबाद
पश्चिम बंगालने राजस्थानचा 2-0 असा पराभव करून संतोष ट्रॉफीसाठी होत असलेल्या 78 व्या वरिष्ठ राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.
गट अ मधील अन्य एका सामन्यात जम्मू-काश्मिरने मणिपूरला 1-1 असे बरोबरीत रोखले. 32 वेळच्या विजेत्या बंगालचे आता 3 सामन्यांतून 9 गुण झाले असून मणिपूरचे 3 सामन्यात 7 गुण झाले आहेत. जम्मू-काश्मिरने आज पहिला गुण मिळविला. बंगालचे गोल रबिलाल मंडी (45 वे मिनिट) व नरो हरी श्रेष्ठ (56 वे मिनिट) यांनी नोंदवले.
मणिपूरने याआधीच्या सामन्यांत विद्यमान विजेत्या सेनादल व राजस्थान यांच्यावर विजय मिळविले होते. त्यांना एन. रोमेन सिंग पूर्वार्धातील जादा वेळेत गोल नोंदवून आघाडी मिळवून दिली. पण अकिफ जावेदने इंज्युरी टाईममध्ये गोल नोंदवत जेकेला बरोबरी साधून दिली.









