अरविंद केजरीवालांची घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणूक नजीक आल्याने आम आदमी पक्षाने कंबर कसली आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आप संयोजक अरविंद केजरीवालांनी यापूर्वी महिलांना दर महिन्याला 1 हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. आता बुधवारी केजरीवाल यांनी संजीवनी योजनेची घोषणा केली आहे. संजीवनी योजनेचा लाभ 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना घेता येणार असल्याचे केजरीवालांनी म्हटले आहे.
या योजनेच्या अंतर्गत शासकीय किंवा खासगी रुग्णालयात सर्वांवर मोफत उपचार होतील. दिल्लीत आमच्या पक्षाचे सरकार येताच ही योजना संमत करत वृद्धांना तंदुरुस्त ठेवण्याचे काम केले जाईल. याच्या बदल्यात दिल्लीतील सर्व ज्येष्ठ नागरिक मतदानाच्या स्वरुपात आम आदमी पक्षााल समर्थन देतील अशी अपेक्षा असल्याचे वक्तव्य केजरीवाल यांनी केले आहे.
आमचे सरकार श्रीमंत अणि गरीबांमध्ये कुठलाही भेद करणार नाही. सर्वांवर मोफत उपचार होतील. वृद्धांची नोंदणी लवकरच सुरू केली जाईल आणि लवकरच सर्वांना ओळखपत्र प्रदान करण्यात येईल असा दावा केजरीवालांनी केला आहे.









