जॉनी डेप्पला पूर्ण जग एक प्रभावी अभिनेता म्हणून ओळखते. जॉनी मागील काही वर्षांपासून स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यावरून टॉक ऑफ द टाउन ठरलेला आहे. अंबर हर्डपासून घटस्फोट घेतल्यावर जॉनी हा अॅडव्होकेट जोएल रिचसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. परंतु दोघेही परस्परांविषयी फारसे गंभीर नव्हते असे बोलले जात होते. आता पायरेट्स ऑफ कॅरेबियन स्टार पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला असून याचे कारण स्पॅनिश इन्फ्लुएंसर जेस बोर्डिउ आहे.
काही महिन्यांपूर्वी जेसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात ती जॉनी डेपला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसून आली होती. याचबरोबर दोघांना अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे. मागील महिन्यात जॉनी हा एका चित्रपट महोत्सवात सामील झाला होता, त्यावेळी त्याच्यासोबत जेस बोर्डिउ ही सेविले या शहरात दिसून आली होती. जेस बोर्डिउ ही इन्फ्लुएंसर आहे, परंतु तिने स्वत:च्या बायोमध्ये फिल्म मेकर आणि फोटोग्राफर असा देखील उल्लेख केला आहे.
अलिकडेच जॉनी आणि जेस हे दोघेही लंडनमध्ये एकत्र दिसून आले आहेत. तसेच दोघेही एकाच प्रॉजेक्टवर काम करत असल्याचे समजते. जॉनी आणि जेस हे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. तर जॉनीचे नाव यापूर्वी लंडनमधील अॅडव्होकेट जोएल रिचसोबत जोडले गेले होते. दोघेही एका खटल्यादरम्यान एकत्र आले होते.









