हुक्केरी पोलिसांची कारवाई : दोन्ही प्रकरणांचा छडा
बेळगाव : हुक्केरी शहरातील एका पतसंस्थेत आणि किराणा दुकानात चोरी करणाऱ्या चोरट्याला हुक्केरी पोलिसांनी मंगळवार दि. 17 रोजी अटक केली आहे. राघवेंद्र शिवशंकर दोडमणी (वय 26, रा. गणेशनगर, हुक्केरी) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून पाच हजार ऊपयांची रोकड आणि चोरीसाठी वापरलेली एक लाख ऊपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. गत आठवड्यात हुक्केरी शहरातील एका पतसंस्थेत आणि किराणा दुकानात चोरी झाल्याची नोंद हुक्केरी पोलीस ठाण्यात झाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक महांतेश बसापुरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. वरील संशयिताला तब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने दोन्ही ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्याकडून पाच हजार ऊपयांची रोकड आणि चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारी एक लाख ऊपये किमतीची मोटारसायकल जप्त केली. संशयिताला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली.









