सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी माठेवाडा -आत्मेश्वर मंदिराजवळ असलेल्या रस्त्यावर काही दिवसांपूर्वी नळदुरुस्तीसाठी चर खोदण्यात आला होता. मात्र हा चर दुरुस्ती झाल्यानंतर देखील बुजविण्यात आला नव्हता. त्यामुळे वाहनचालकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती . दै . तरुण भारत संवादने देखील याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते . परंतु दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाकडून हा चर व्यवस्थितरित्या बुजविण्यात आला असून याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे .









