वृत्तसंस्था / दुबई
मंगळवारी घोषित करण्यात आलेल्या आयसीसी महिलांच्या वनडे फलंदाजी आणि गोलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या मानांकनात चांगलीच सुधारणा झाली आहे.
भारताची डावखुरी फलंदाज आणि उपकर्णधार स्मृती मानधनाने अग्रस्थानाच्या समीप झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाची सुदरलॅन्ड वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत 15 व्या स्थानावर मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला गोलंदाजांनीही या मानांकन यादीत बरीच मोठी मुसंडी मारली आहे. महिला गोलंदाजांच्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनीही बऱ्यापैकी कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाची गार्डनर 29 व्या स्थानावर आहे. भारताची स्मृती मानधनाने फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत दुसरे स्थान मिळविले आहे.









