वृत्तसंस्था / पुणे
2024 च्या कबड्डी हंगामातील येथे सुरू असलेल्या 11 व्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील सामन्यात दबंग दिल्लीने बंगाल वॉरियर्सचा 47-25 अशा 22 गुणांच्याफरकाने दणदणीत परभव करुन प्ले ऑफ गटात प्रवेश केला.
या सामन्यात दबंग दिल्लीचा हुकमी रायडर अशु मलिकने 17 गुण नोंदविले. त्याच प्रमाणे दिल्ली दबंगने या स्पर्धेत आतापर्यंत सलग 13 सामन्यात पराभव पत्करलेला नाही. या स्पर्धेत प्ले ऑफ फेरी गाठणारा दबंग दिल्ली हा पहिला संघ आहे. त्याने गेल्या सहा प्रो कब•ाr लीग स्पर्धेत प्ले ऑफ फेरीत प्रवेश मिळविण्याचा विक्रम केला आहे. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात बंगाल वॉरियर्सच्या सुलतान फजल अत्राचेलीने एकाकी लढत देत दबंग दिल्लीच्या हुकमी रायडर्सना चोख प्रत्युत्तर दिले. दबंग दिल्लीच्या अशु मलिकने आपल्या सुपर चढाईवर बंगाल वॉरियर्सचे सर्वगडी बाद केले. बंगाल वॉरियर्सतर्फे मयुर कदम, प्रणय राणे, नितेशकुमार आणि फजल अत्राचली यांनी बऱ्यापैकी कामगिरी केली. दबंग दिल्लीच्या अशु मलिकने सुपर 10 गुण नोंदविले. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत दबंग दिल्लीने बंगाल वॉरियर्सवर 26-9 अशी आघाडी मिळविली होती.
पाटणा पायरेटसकडून पुणेरी पल्टन पराभूत









