वार्ताहर/किणये
हंगरगा गावची कन्या आराध्या केशव नागणवाडकर हिने कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश मिळविले आहे. शानभाग हॉल बेळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कम्प्लीट कराटे अकॅडमी कर्नाटक व जिल्हा कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 14 व्या इंटरस्कूल व कॉलेज कराटे स्पर्धेमध्ये 14 ते 17 वर्षाखालील गटांमध्ये पहिला नंबर पटकावला आहे. ती हंगरगा येथील शाळेत चौथीमध्ये शिकत असून मोहननगर येथील मनोप्रभा या ठिकाणी कराटेचे प्रशिक्षण घेत आहे. बेळगाव असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर व प्रशिक्षक हरीश सोनार यांचे मार्गदर्शन तिला लाभत आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.









