मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची माहिती : उचगाव येथील प्राचीन काळातील हनुमान मंदिराचा स्लॅबभरणी कार्यक्रम
वार्ताहर/उचगाव
बेळगाव ग्रामीण मतदार क्षेत्राचा विकास, यापूर्वी कोणीच केला नाही त्यापेक्षा अधिक करून या भागाचा खऱ्या अर्थाने कायापालट करून दाखविला आहे. पंधराशे कोटींची कामे सध्या चालू आहेत. हीच आमच्या कामाची पोचपावती असल्याचे मनोगत राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी व्यक्त केले. उचगाव येथील जीर्ण झालेल्या प्राचीन काळातील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे. या मंदिराचा स्लॅबभरणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित जनतेला आपल्या कार्याबद्दलची माहिती देताना आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा.पं. माजी सदस्य बी. एस. होनगेकर होते. कार्यक्रमाला ग्रा. पं. अध्यक्षा मथुरा तेरसे, उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, बुडाचे माजी अध्यक्ष युवराज कदम, ग्रा.पं. माजी अध्यक्ष संभाजी कदम, सदस्य रामा कदम, अशोक हुक्केरीकर, परशराम चौगुले, बाबुराव चौगुले, निळकंठ कुरबुर उपस्थित होते.
स्वागत गीतानंतर कालवण मशीनचे पूजन लक्ष्मी हेब्बाळकर व मान्यवर तर कॉलम भरणी व पूजन इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवराज कदम म्हणाले, उचगाव-मण्णूर शेतवडीतून जाणाऱ्या रस्त्यासाठी दोन कोटी, उचगावमध्ये मराठा भवनसाठी दोन कोटी, तसेच या भागात आत्तापर्यंत 120 मंदिरांना दहा कोटीचा निधी देण्यात आला आहे. 45 खोल्या अंगणवाडीसाठी मंजूर केल्या असून त्याचे काम सुरू आहे. प्राथमिक शाळेसाठी 53 शाळा खोल्या मंजूर केल्या असून त्या कामानाही सुऊवात केलेली आहे. सध्या 120 मंदिरांचे काम हाती घेतले असून त्यांना दहा कोटी निधी मंजूर केला असून ही सर्व कामे सध्या प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला गावातील पुऊष आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूत्रसंचालन एन.ओ. चौगुले यांनी केले. आभार बाळकृष्ण देसाई यांनी मानले.









