वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
यजमान द. आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. दरम्यान द. आफ्रिकेने या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून मालिका विजय यापूर्वीच मिळविला आहे.
तिसऱ्या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी पावसाच्या सरी सुरू झाल्या. त्यामुळे पंचांनी खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला. पंचांनी काहीवेळ पाऊस थांबण्याची वाट पाहिली. पण संततधार सुरू असल्याने अखेर हा सामना रद्द केल्याची घोषणा त्यांनी केली. द. आफ्रिकेने ही मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली. द. आफ्रिकेचा कर्णधार क्मलासन आणि पाकचा कर्णधार मोहम्मद रिझवान यांनी हस्तांदोलन करत ही मालिका संपल्याचे जाहीर केले. या मालिकेत द. आफ्रिकेच्या जॉर्ज लिनेडीला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याने पहिल्या दोन सामन्यान फलंदाजीत 48 धावा तर गोलंदाजीत 5 गडी बाद केले. द. आफ्रिकेच्या डेव्हीड मिलरने या मालिकेत अष्टपैलु कामगिरी केली. द. आफ्रिकेने या मालिकेतील पहिल्या सामन्यात 11 धावांनी तर दुसऱ्या सामना 7 गड्यांनी जिंकला. आता उभय संघामध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 17 डिसेंबरला पर्ल येथे खेळविला जाईल.









