वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अडवाणींच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यांच्यावर सध्या वृद्धापकालीन आजारांवर उपचार सुरू आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. न•ा यांनीही अडवाणी यांच्या कुटुंबीयांशी आणि डॉक्टरांशी त्यांच्या प्रकृतीबाबत चर्चा केली. शनिवारी अडवाणी यांची प्रकृती खालावली होती. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या दोन आठवड्यांपासून लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती ठीक नव्हती. सध्या ते अपोलो हॉस्पिटलचे वरिष्ठ न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. 97 वर्षीय लालकृष्ण अडवाणी यांना गेल्या काही दिवसांपासून आरोग्यासंबंधी समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते आता त्यांच्या निवासस्थानी मुक्काम ठोकून सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नाहीत.









