वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तांत्रिक बिघाडामुळे इस्तंबूल ते दिल्ली विमान शुक्रवारी अचानक रद्द करण्यात आल्यामुळे इंडिगोचे शेकडो प्रवासी इस्तंबूल विमानतळावर अडकून पडले. तुर्कीच्या राजधानीत अडकलेल्या या प्रवाशांना मायदेशी आणण्यासाठी इंडिगोने इस्तंबूलला दोन विमाने पाठवली आहेत. या विमानांनी भारतीय प्रवासी दिल्ली आणि मुंबईत दाखल होणार आहेत. या विमानांना उशीर झाल्यामुळे प्रवाशांनी सोशल मीडियावर विमानसेवेबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे अनेक प्रवासी 24 तासांपेक्षा जास्त काळ अडकून पडले होते. सदर प्रवाशांनी सोशल मीडियावर विलंब आणि सुविधांच्या अभावाबद्दल तक्रार केली. काही प्रवाशांनी विमानतळावरील गर्दीचे फोटो आणि व्हिडीओही व्हायरल केले आहेत.









