कुडाळ / प्रतिनिधी
मालवण मधील सुप्रसिद्ध वकील आणि पं. अजित कडकडे यांचे शिष्य ॲड. दिलीप प्रभाकर ठाकूर यांना यावर्षीच्या नृसिंहवाडीत सुरू असलेल्या श्री दत्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने महाराजांची गायनसेवा करण्याची संधी मिळाली. रसिकांनी त्यांच्या गायनाला उस्फूर्तपणे दाद दिली. ॲड ठाकूर म्हणाले आपल्या गायनसेवेला सुरुवातीला राग मुलतानी मधील “रब्बा मेंडे औगुन ना धरो” या विलंबित एकतालातील बडा ख्याल बंदीश व तीनताल मध्य लयीतील “मोरा मन बस करलिनो शाम” हा छोटा ख्याल याने सुरवात केली. त्यानंतर तुझ्या कृपेने दिन उगवे हा , गुरू एक जगी त्राता , कृष्णातीरी वसले , शिर्डी माझे पंढरपूर तसंच घेई छंद मकरंद, हे सुरांनो चंद्र व्हा अशी नाट्यपदे सादर केली. उपस्थित प्रेक्षकांतुन “निघालो घेऊन दत्ताची पालखी” व “मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने ” या दोन गाण्यांची खास फर्माइश आली व ॲड. ठाकूर यांनी ह्या फर्माइशी समर्थपणे पूर्ण केल्या. गायनसेवेची अखेर “मन तृप्त झाले तुझ्या दर्शने” या भैरवीने केली. सुमारे अडीच तास चाललेल्या शास्त्रीय संगीत , भक्तीगीत, अभंग व नाट्यपदे हि गायन गायनसेवा उपस्थित रसिकवर्ग मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते .त्यांना तबल्याकरिता साथ. किशोर सावंत, सावंतवाडी, हार्मोनियम साथ मंगेश मेस्त्री ,सावंतवाडी , मंजिरीची साथ स्वप्नील आजगांवकर , तुळसुली यांनी केली.









