नागरिकांचे आरोग्य धोक्यात
वार्ताहर/मजगाव
पिरनवाडी पट्टण पंचायतसमोर गटारीचे दूषित पाणी तुंबून दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.पिरनवाडी पट्टण पंचायतीच्या अधिकारीवर्गाच्या निष्काळजीपणामुळे पिरनवाडी गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग निदर्शनास येत आहेत. जनता प्लॉट येथील सर्व घरांचे दूषित पाणी पट्टण पंचायतीच्या समोरील प्रवेशद्वारासमोर भल्यामोठ्या खड्ड्यात तुंबून रस्त्यावरुन रोज वाहत आहे. अनेक नागरिक पंचायत ऑफीसकडे रोज ये-जा करीत असतात. त्यावेळी त्यांना त्या दूषित पाण्यातूनच ये-जा करावे लागत आहे. जर पट्टण पंचायतीच्या बाजुला दुर्गंधी पसरलेले अधिकारीवर्गाला दिसत नसेल तर गावातील परिस्थिती काय असेल? यासाठी नागरिक व तरुण एकत्र येवून सदर पंचायतीवर मोर्चा काढून समस्यांचे निवेदन देवून जाब विचारणार असल्याचे युवावर्गाने सांगितले.









