बेळगाव : फिनिक्स स्कूल आयोजित फिनिक्स फौंडर विक निमित्त आयोजित 17 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत सेंट झेवियर्सने इस्लामीयाचा टायब्रेकरमध्ये 5-4 असा पराभव करुन फिनिक्स चषक पटकाविला. होनगा येथील फिनिक्स मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या साखळी सामन्यात झेवियर्सला पोतदार इंटरनॅशनल स्कूलने शुन्य बरोबरीत रोखले. दुसऱ्या साखळी सामन्यात झेवियर्सने ज्ञानप्रबोधन संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. झेवियर्सतर्फे इशान घाडगीने एकमेव गोल केला. उपांत्यपूर्व फेरीत झेवियर्सने एमव्हीएमचा 1-0 असा पराभव करुन उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. झेवियर्सतर्फे अर्जुन सानिकोप्पने विजयी गोल नोंदविला. उपांत्य फेरीच्या सामन्यात झेवियर्सने कनक मेमोरियल संघाचा 3-0 असा पराभव केला. झेवियर्सतर्फे अर्जुन सानिकोप्प, अर्सलीन मुल्ला, इशान घाटगे यांनी केले.
अंतिम सामन्यात झेवियर्सने इस्लामीयाचा टायब्रेकरमध्ये पराभव केला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये झेवियर्सने 5-4 अशा गोल फरकाने विजय मिळविला. झेवियर्सतर्फे अर्जुन सानिकाप्प, रुजेन उचगावकर, इशान घाटगे, तेजराज निंबन्नावर, माहीद भडकली यांनी गोल केले. इस्लामीयातर्फे अनिस, शरीफ, रिझवान व सादीक यांनी गोल केले. सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते चषक देवून गौरविण्यात आले. या संघात उजैर रोटीवाले, अर्जुन सानिकाप्प, सोफियन बिस्ती, रेहान शेख, शेफ माडिवाले, माहीद भडकली, तेजराज निंबन्नावर, रुजैन उचगावकर, गौरव गोदवानी, इशान घाटगे, समर्थ भंडारी, ओम पुजारी, झियान मुल्ला, जुनेद, अर्सलीन मुल्ला, उमर फारुक आदी खेळाडूंचा समावेश आहे.









