मालवण । प्रतिनिधी
सहकारमहर्षी कै.डी.बी.ढोलम यांच्या स्मृतिदिनानिमित्त आभाळमाया ग्रुप आणि जी.एच.फिटनेस कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.१५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.कोरोना काळापासून कट्टा पंचक्रोशीत सामाजिक कार्यासाठी सुरू झालेल्या आभाळमाया ग्रुप कडून २०२१ पासून सहकारमहर्षी कै.डी.बी.ढोलम साहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रेकॉर्डब्रेक रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. दरवर्षी हे रक्तदानशिबीर नोव्हेंबर महिन्यात घेण्यात येते. पण राज्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे हे रक्तदान शिबिर डिसेंबर महिन्यात घेण्यात येत आहे. आभाळमाया ग्रुपकडून हे ११ वे रक्तदान शिबिर आहे. आभाळमाया ग्रुप, जी.एच.फिटनेस, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, इंग्लिश मीडियम स्कूल आणि सिनिअर कॉलेज यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर भरविण्यात येणार आहे. या रक्तदान शिबिराला उपस्थित राहून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन आभाळमाया ग्रुपचे संस्थापक श्री.राकेश डगरे यांनी केले आहे.









