प्रतिनिधी
बांदा
निगुडे गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव रविवार दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी होणार असून सकाळी देवीची पूजा, ओटी भरणे कार्यक्रम, तसेच रात्री पालखी प्रदक्षिणा अशा विविध कार्यक्रमाने जत्रोत्सव संपन्न होणार आहे. त्याचप्रमाणे रात्रौ आजगावकर दशावतर नाट्य मंडळ आजगाव यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविकांनी, भक्तगणांनी जत्रोत्सवाला उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन निगुडे ग्रामस्थ, मानकरी व देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Previous Articleजयगडमध्ये वायुगळतीने ५९ विद्यार्थ्यांना बाधा
Next Article बाडग्यांनी हिंदुत्त्वावर बोलू नये- आमदार लाड









