रत्नागिरी :
जयगड येथील जेएसडब्ल्यू कंपनी परिसरात गॅस गळतीमुळे शेजारील नांदिवडेमधील जयगड माध्यमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना मळमळ आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने मोठी खळबळ उडाली. गुरुवारी दुपारी १२. ३० वाजल्यापासून विद्यार्थ्यांना हा त्रास सुरु झाला.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारासाठी जयगड उर्जा रुग्णालयात दाखल केले. मात्र याठिकाणी अपुऱ्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना खंडाळा प्राथमिक उपचार केंद्र व सांयकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकूण ५९ विद्यार्थ्यांना ही बाधा झाली. यामध्ये ५३ मुली, ६ मुलांसह एका महिलेचा समावेश आहे. त्यापैकी दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने प्रशासकीय यंत्रणा पुरती हादरून गेली आहे.








