कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिका अतिक्रमण विभाग व पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने शहरातील अतिक्रमणाविरोधात गुरुवारी संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये 7 हातागड्या, वजन काटे 42, लोखंडी खॉट 4 व जप्त करण्यात आले व 6 शेड, काढण्यात आली तशेच शास्त्राrनगर येथील ग्राउंड सहभावतील परिसर,मध्ये वाहतुकीस अडथळा व धुळखात पडलेल्या 32 बेवारस वाहनांना नोटिसा लावण्यात आल्या.
शहराला सध्या अतिक्रमणांचा विळखा पडला असून, यामुळे शहरात वाहतुकीची समस्या वाढली आहे. याविरोधत गुरुवारी महापालिका आणि शहर वाहतूक शाखेच्या वतीने अतिक्रमणविरोधात धडक कारवाई सुरु करण्यात आली. गुरुवारी कारवाईच्या पहिल्याच दिवशी तारबाई रोड, कपिलतीर्थ मार्केटमधील कपिलेश्वर मंदिर, लक्ष्मीपुरी रोड, व्हिनस कॉर्नर, सेंट्रल बस स्थानक, शाहूपुरी रेल्वे फाटक या ठिकाणी कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण 7 हातागड्या, वजन काटे 42, लोखंडी खॉट 4 व जप्त करण्यात आले व 6 शेड हटविण्यात आली.
शास्त्राrनगर येथील ग्राऊंडभोवती परिसरामध्ये वाहतुकीस अडथळा व धुळखात पडलेल्या 32 बेवारस वाहनांना नोटिसा लावण्यात आल्या. ही कारवाई शहर वाहतूक शाखचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, अतिक्रमण अधीक्षक विलास साळूंखे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, मुकादम रवींद्र कांबळे व अतिक्रमण कर्मचारी, वाहतूक नियंत्रण शाखा कर्मचारी यांच्या मार्फत करण्यात आली.








