देवरुख :
शहरातील भारती जयंत राजवाडे यांना पुणे येथील साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व सर्च फाउंडेशनच्यावतीने राज्यस्तरीय आदर्श क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळा सावित्रीबाई फुले सांस्कृतिक सभागृह गंज पेठ पुणे येथे विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. राजवाडे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असून प्रामाणिक व निःस्वार्थ हेतूने काम करत आहेत.
पुणेतील कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर जान्हवी राजे पाटील, मॉडेलिंग अभिनेत्री चित्रा दीक्षित, सिनेस्टार अभिनेते बाळराजे वाळुंजकर, सिनेस्टार अभिनेत्री भक्ती साधू सहाय्यक प्राध्यापक हिंगोली धाराशिव वैजनाथ शिराळे, गिर्यारोहक प्रशिक्षक-सत्यशोधक विचार मंच, राष्ट्रीय वक्त्या, जिल्हाध्यक्ष अनिता चेतन घाटगे ईशान ग्रुप ऑफ कंपनी पुणे संचालक नितीन सूर्यवंशी, ऍड. उमाकांत आदमाने, कवी-साहित्य निवेदक अन्वी चेतन घाडगे, संस्थापक आयोजक सचिन हळदे, राहुल भाऊ निकाळजे, भारत हळदे, सत्यदिप खडसे, अध्यक्ष पारवे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सोहळा संपन्न झाला. पुरस्काराबद्दल राजवाडे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.








