विविध संस्थांमध्ये गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांची मागणी
बेळगाव : विविध कंपन्या आणि आर्थिक संस्थांनी गोरगरीब जनतेच्या ठेवींचा परतावा केला नाही. त्यामुळे ठेवीदार अडचणीत आले आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. तातडीने या संस्थांमधील ठेवी ठेवीदारांना मिळाव्यात, अशी मागणी विविध संस्थांमध्ये फसगत झालेल्या ठेवीदार संघटनेतर्फे करण्यात आली. राज्यात विविध खासगी संस्थांमध्ये ठेवी ठेवलेल्या नागरिकांची फसवणूक झाली आहे. यामध्ये लाखो एजंटांनी सर्वसामान्यांना फसवले आहे. त्यामुळे एजंट व गुंतवणूकदारांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. फसगत झालेले सर्व ठेवीदार अडचणीत आले आहेत. त्यांच्या ठेवी तात्काळ अदा करून दोषींवर तातडीने करवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.









