संग्रहालय,सायन्स सेंटर संदर्भात जाणकारांशी चर्चा : एस. कार्तिकेयन यांची माहिती
कोल्हापूर :
मेन राजाराम हायस्कूल या वास्तुत शाळाच असेल . ती शाळा आदर्श स्वरूपाची घडेल असे त्याचे नियोजन असेल .आणि शाळेचे अस्तित्व कायम ठेवून तेथे एखादे संग्रहालय व सायन्स सेंटर साठी जाणकारांशी चर्चा केली जाईल . असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले .
ते म्हणाले, राजाराम महाराज (दुसरे )यांनी शिक्षण प्रसाराच्या उद्देशानेच ही राजप्रसादासारखी वास्तू बांधली . जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत ही वास्तू आहे . तेथे मेन राजाराम हायस्कूल आहे . राजाराम महाविद्यालय ही तेथेच होते . या वास्तूचे संवर्धन निश्चित केले जाणार आहे . त्यासाठीच्या त्यासाठी शाळेच्या मान्यवर माजी विद्यार्थ्यांशीही चर्चा केली जाणार आहे . कोल्हापुरातील काही जणांनी या वास्तुत ऐतिहासिक कागदपत्रे व दुर्मिळ छायाचित्रांचे दालन असावे इच्छा अशी इच्छा व्यक्त केली आहे . काही जणांच्या दृष्टीने सायन्स सेंटरला ही वास्तू योग्य वाटते . शाळेचे अस्तित्व कायम ठेवून त्याचाही विचार केले जाईल . जेणेकरून ही वास्तू लोकांच्या अधिक जवळ येईल .या वास्तूचे महत्त्व लोक जाणून घेतील . नुकतीच विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनीही या वास्तूची पाहणी केली आहे . या शाळेच्या वास्तूला ऐतिहासिक वारसा आहे . राजाराम महाराज दुसरे यांच्या शिक्षण विषयक दूरदृष्टीचे ते वास्तव आहे . त्यामुळे जतन व संवर्धनावर नक्कीच लक्ष केंद्रित केले गेले आहे .








