दासाप्पा शानभाग क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित 34 व्या दासाप्पा शानभाग चषक 16 वर्षाखालील मुलांच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात हेरवाडकर व केएलई ’अ’ संघाने शानदार विजय नोंदविले. गुरुवारच्या पहिला सामन्यात हेरवाडकर संघाने शांतिनिकेतन खानापूरच्या संघाचा 7 गड्याने पराभव केला. शांतिनिकेतन शालेय संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात सर्वबाद 98 धावा केल्या. त्यात श्रेयस पाटीलने 2 चौकारासह 25, प्रदीपने 2 चौकारासह 31, रामने 13 धावा केला. हेरवाडकर संघातर्फे विराज माळवी यांनी चार तर सुजल इटगीने दोन गडी बाद केले. प्रत्यत्तरादाखल खेळताना हेरवाडकर संघाने केवळ 12.2 षटकात 3 गडांच्या मोबदल्यात 102 धावा जमवत सामना 7 गड्यांनी जिंकला.
हर्ष नाशिकपुडी 6 चौकार 34 तर विराज माळवी 4 चौकार 25 धावा केल्या. शांतिनिकेतनतर्फे श्रेयस पाटील यांनी 2 गडी बाद केले विराज माळवी ‘सामनावीर’ ठरला. दुसऱ्या सामन्यात केएलई इंटरनॅशनल शालेय संघाने फिनिक्स शालेय संघाचा 166 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना केएलई संघाने 25 षटकात 8 बाद 195 धावा केल्या. करण रामूरवाडी 4 चौकार 3 षटकारांसह 60, कौस्तुभ पाटील 28, आऊष कुलकर्णी 24, युग शहा 23 धावा केल्या. फिनिक्सतर्फे वेदांतने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना फिनिक्स संघाचे डाव 9.5 षटकात 29 धावात आटोपला. केएलईतर्फे विख्यात व युग शहा यांनी प्रत्येकी 3 तर करण रामगुरवाडी व अतिथी भोगण यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.









