बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेतून शहरात सुरू असलेल्या कामांसह जिल्हा ऊग्णालयाच्या आवारात नव्याने उभारण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची सरकारच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनी भेट देऊन पाहणी केली. उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत तसेच आवश्यवक उपकरणे आणि साहित्यासाठी सरकारला प्रस्ताव पाठविण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली. हिवाळी अधिवेशनिमित्त राज्यातील मंत्रिमंडळ, आमदार आणि अधिकारी बेळगावात वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून संबंधित खात्याच्या कार्यालयाना भेटी देऊन सद्यस्थिती जाणून घेतली जात आहे. मंत्री व अधिकारी कधी कोणत्या कार्यालयाला भेट देतील हे सांगता येत नाही. त्यामुळे विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयांच्या स्वच्छतेसह आवश्यक ती सर्व तयारी ठेवली आहे. जिल्हा ऊग्णालयातील प्रसूतिविभागासह जिह्यातील विविध ऊग्णालयात मोठ्या प्रमाणात
माता-शिशुंचा मृत्यू झाल्याचे पुढे आल्याने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बेळगावात खळबळ उडली. विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी जिल्हा ऊग्णालयातील प्रसूतिविभागाला भेट देऊन तेथील परिस्थितीची माहिती जाणून घेतली. तसेच सर्व या परिस्थितीला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यामुळे सध्या बेळगाव जिल्हा ऊग्णालय चर्चेत आले आहे. त्यातच काल सरकारच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यानी बिम्सला भेट देऊन त्याठिकाणी नव्याने बांधलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटच्या इमारतीची पाहणी केली. गोर गरीब जनतेला चांगल्या प्रकारची आरोग्यसेवा मिळावी, यासाठी सरकारने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारले आहे. हॉस्पिटलसाठी जी काही उपकरणे, साहित्य आवश्यक आहे, त्यासाठी प्रस्ताव पाठविण्याची सूचना त्यांनी बिम्सच्या अधिकाऱ्यांना केली. यावेळी बिम्सचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी, बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. इराण्णा पल्लेद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विठ्ठल शिंदे उपस्थित होते. त्याचबरोबर स्मार्ट सिटीअंतर्गत व्हॅक्सिन डेपो येथे सुरू असलेल्या कामांची देखील त्यांनी पाहणी करून माहिती जाणून घेतली.









