सांगली
सांगली येथील कवलापूर जवळ दुचाकी व प्रवासी जिपची समोरासमोर धडक होऊन अपघात झाली. या अपघातात आईसह दोन मुलांचा मृत्यू झाला आहे तर एकजण जखमी आहे. या अपघातात विशाल म्हारगुडे जखमी झाले असून सांगलीच्या शासकिय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
विशाल म्हारगुडे हे पत्नी आणि दोन मुलांना घेऊन लग्नासाठी जात होते. अपघातातील जखमी व मृत सर्वजण आटपाडी येथील तळेवाडी येथील राहणारे आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अपघाताचा तपास सांगली पोलिसांकडून सुरू आहे.








