ठाणे
ठाण्यात एका गृहनिर्माण संकुलाच्या पाण्याच्या पाइपलाइनमध्ये मांजरीचे पिल्लू अडकले होते. या पिल्लाला अग्निशमन दलाने सुखरुप सुटका केली, अशी माहिती दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सोमवारी रात्री ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला यशोधन नगर परिसरातील गृहसंकुलातून कॉल आला, अशी माहिती नागरी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी यांनी दिली.
दरम्यान स्थानिक अग्निशमन दलाच्या जवानांनी, RDMC टीमसह, 30 मिनिटांच्या ऑपरेशनमध्ये मांजरीचे पिल्लू पाईपलाईन मधून सुखरुप बाहेर काढले. या ऑपरेशनमध्ये पिल्लाला सुखरुप बाहेर काढण्यासाठी पाईपलाईन मधून पाणी सोडावे लागल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.








