कोल्हापूर :
महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने शहरात सोमवारी शहरात थकीत पाणीपट्टी आणि अनधिकृत नळ कनेक्शनविरोधात धडक मोहिम हाती घेण्यात आली. सोमवारी कारवाईच्या पहिल्या दिवशी पाणीपुरवठा विभागाच्या वतीने 6 लाख 61 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. जलअभियंता हर्षदिप घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
अनधिकृत नळ कनेक्शन देणाऱ्या नोंदणीकृत प्लंबर यांचा परवाना रद्द करणेबाबत अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी आदेश दिले होते. त्यानुसार सोमवार पासून ही मोहिम हाती घेण्यात आली. सोमवारी एस.टी.स्टॅण्ड परिसर, ताराबाई पार्क, नागाळपार्क येथील हॉटेल्स, लॉजिंग्ज व आपार्टमेंट्स इत्यादी ठिकाणी मिटर रिडींग तपासणी व थकबाकी वसुलीची कारवाई करण्यात आली. या कारवाई करुन 6 लाख 61 हजार रुपयांची थकबाकी वसुल करण्यात आली.
प्रशासक कार्तिकेयन एस., अतिरिक्त आयुक्त राहूल रोकड व जल अभियंता हर्षजित घाटगे, अधिक्षक प्रशांत पंडत यांच्या मार्गदर्शनाखाली मिटर रिडर जीवन मिठारी, बाबासो निकम, रमेश मगदूम, सुभाष सावंत व सहाय्यक कर्मचारी यांनी केली.
शहरात 5 वसुली पथकांची नेमणूक
पाणीपुरवठा विभागाच्या वतीने वसुली मोहिम राबविणे करीता शहरामध्ये 5 वसुली पथक नेमलेली आहेत. त्यांचेमार्फत येथून पुढेही अनधिकृत नळ कनेक्शन तपासणी, वसुलीची मोहीम सुरु राहणार आहे. तरी, शहरातील सर्व
नागरिकांनी आपली अनधिकृत नळ कनेक्शन रितसर अर्ज करुन व योग्य ते शुल्क भरुन नियमित करावी. तसेच आपल्या पाणी बिलाची थकबाकी वेळेवर भरणा करून नळ कनेक्शन बंद करणे, मिळकतीवर बोजा नोंद करुन घ्यावे असे आवाहन जलअभियंता हर्षदीप घाटगे यांनी केले.








