कोल्हापूर :
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या (विफा) वतीने जळगाव येथे 8 ते 12 डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा कनिष्ठ मुलींची फुटबॉल स्पर्धा आयोजित केली जात आहे. या स्पर्धेत प्रतिनिधीत्व करण्यासाठी केएसए कोल्हापूर जिल्हा फुटबॉल संघ शनिवारी रात्री रवाना झाला आहे. कोल्हापूर जिल्हा फुटबॉल संघ निवड चाचणीतून हा संघ तयार केला आहे. कमला कॉलेज व पोलो मैदानात संघ निवड चाचणी व सराव शिबिराचे आयोजन केले होते.
प्रशिक्षक प्रदीप साळोखे, अमित शिंत्रे, रघु पाटील, सोनाली सुतार यांनी चाचणीतून संघ निवडला. तसेच संघाकडून तंत्रशुद्ध सरावही करवून घेतला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून डी लायसन्स प्रशिक्षक अमित शिंत्रे व सहायक प्रशिक्षक म्हणून सोनाली सुतार काम पाहणार आहे. संघाला खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, संभाजीराजे छत्रपती, केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्य मधुरिमाराजे छत्रपती यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
खेळाडूंची नांवे : आसावरी राजाराम पाटील, युगंधरा लक्ष्मण चौगले व खेळाडूंची अशी : निकीता साळोखे (गोलरक्षक), जान्हवी ढेरे, सिद्धी सूर्यवंशी, प्रांजली कांबळे, समृद्धी ढेरे, संयोगिता शिंदे, वैभव कानडे, यशस्वी बेनाडी, केतकी कोंडस्कर, संस्कृती तुरूके, सायली देवणे, संध्याराणी जानवेकर, लक्ष्मी मेंगाणे, अनुष्का लोखंडे, श्रावणी साळे, स्वरूपा पाटील.








