कृषी विभागाच्या हॉर्टसॅप अंतर्गत सातुळीत आयोजन
ओटवणे प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या हॉर्टसॅप अंतर्गत सातुळी येथे आयोजित करण्यात आलेल्या काजू पीक शेतकरी शेती शाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी उपस्थित कृषी अधिकाऱ्यांनी शेतक-यांशी सवांद साधताना त्यांना बहुमोल मार्गदर्शनही केले.यावेळी सातुळी बावळाट उपसरपंच स्वप्निल परब, कृषी पर्यवेक्षक व्ही. के. पाटील, वाय. सी. सावंत, प्रताप चव्हाण,पोलीस पाटील अरूण परब, कृषि सहाय्यक एस. ए. घेरडे, कृषी मित्र प्रदीप सावंत, कृषि सहाय्यक एस. व्ही. शिर्के, ए. आर. खराडे, मिलिंद निकम, विमा प्रतिनिधी आशिष आईर आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थित अधिकारी वर्गाने काजू बागायतीमध्ये संजिवकाचा वापर आणि प्रक्रीया उद्योग याबाबत शेतक-यांना सखोल मार्गदर्शन करून शेतक-यांच्या सर्व शंकाचे निरसन केले. यावेळी अरुण परब आदी शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रगतशील शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक व्ही. के. पाटील यांनी सुत्रसंचालन कृषि सहाय्यक एस. ए घेरडे यानी कृषि सहाय्यक एस. ए. घेरडे तर आभार उपसरपंच स्वप्निल परब यांनी मानले.









