वृत्तसंस्था / नवी दिल्ली
क्षयरोगावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने एका अभियानाची घोषणा केली आहे. हे अभियान देशभरात 100 दिवस चालविण्यात येणार असून या रोगाचे उन्मूलन करण्यासाठी या द्वारे प्रयत्न करण्यात येणार आहेत. देशात सध्या क्षयरोगाच्या प्रमाणात घट होत आहे. 2015 च्या तुलनेत आज क्षयरोग्यांच्या संख्येतील घट ही दुप्पट झाली आहे. तसेच क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचीही संख्या आता 21.4 टक्के इतक्या अधिक प्रमाणात घटली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश न•ा यांनी शनिवारी एका कार्यक्रमात दिली.
हे अभियान देशाच्या 347 जिल्ह्यांमध्ये हाती घेतले जाणार आहे. या जिल्ह्यांमधील आतापर्यंत प्रकाशात न आलेली क्षयरोग लागण शोधून काढली जाणार असून अशा रुग्णांवर उपचार पेले जातील. अनेकदा रोगनिदानाच्या अभावी अनेक रुग्णांना क्षयरोग असल्याचे कळून येत नाही. त्यामुळे संशयित रुग्णांची तपासणी करुन यांना या रोगाची लागण झाली असल्यास त्यांच्यावर उपचार केले जातील. आता हा रोग असाध्य राहिलेला नाही. या रोगामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमीतकमी पातळीवर आणणे हे ध्येय असल्याची माहिती त्यांनी दिली.









