‘भीतीदायक मुखवटा’ही सापडला
आखाती देश कुवैतमध्ये पुरातत्व तज्ञांनी एक अत्यंत खास शोध लावला आहे. तज्ञांना तेथे 7700 वर्षे जुनी दागिने तयार करणारी एक फॅक्ट्री सापडली आहे. हा आभूषण कारखाना प्रागैतिहासिक उबैद काळातील (5500-400 ख्रिस्तपूर्व) आहे. हा शोध बहरा-1 नावाच्या स्थळावर लागला असून हे कुवैतच्या उत्तर सुबिया वाळवंटात आहे. हे क्षेत्र आखातातील सर्वात जुने स्थळ असू शकते, जेथे मातीच्या भांड्यांचा वापर केला जात होता असा दावा तज्ञांनी या शोधाच्या आधारावर केला आहे. कुवैतच्या राष्ट्रीय क्कृती कला परिषदेचे महासचिव मोहम्मद बिन रेडा यांनी या शोधाची घोषणा करत हा सांस्कृतिक आणि औद्योगिक विकासाचा पुरावा असल्याचे म्हटले आहे.
स्थळावर उत्खननादरम्यान पोलिश आणि कुवैतच्या संशोधकांच्या टीमला मातीची एक मूर्ती मिळाली, ज्यात एक लांब मानवी शीर दाखविण्यात आले आहे. याची वैशिष्ट्यो उबैद संस्कृतीशी संबंधित आहेत. हा मास्क तज्ञांना हैराण करत आहे. कार्यशाळेत अनेक आभूषणांचे आणि मातीच्या भांड्यांचे तुकडे मिळाले आहेत. हे तुकडे सुमारे 7 हजार वर्षे जुने आहेत.
मूर्ती आणि फॅक्ट्रीने उबैद समुदायातील त्यांच्या प्रतिकात्मक किंवा कर्मकांडीय भूमिकांविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. हा शोध उबैद कालखंडाच्या जटिल सांस्कृतिक आणि आर्थिक जाळ्यावर प्रकाश टाकतो. तसेच क्षेत्रीय इतिहासाला आकार देण्यात प्रारंभिक मानवी वस्तींच्या महत्त्वाला समोर आणत असल्याचे कुवैती-पोलिश मोहिमेचे सदस्य आणि प्राध्यापक पिओटर बायलिंस्की यांनी म्हटले आहे.
हा चकित करणारा शोध इस्तंबुलमध्ये ख्रिश्चन चर्चच्या अवशेषांच्या उत्खननादरम्यान भूमिगत कक्ष अणि एका भुयाराच्या अवशेषांच्या शोधानांतर लागला आहे. हे कक्ष 1500 वर्षे जुने आहेत. बीजान्टिन साम्राज्याची राजधानी असताना आणि इस्तंबुलला कॉन्स्टेंटिनोपल या नावाने ओळखले जात असतानाचे हे अवशेष आहेत. हे कक्ष सेंट पॉलीएक्टसच्या चर्चच्या खाली होते.
1960 च्या दशकात रस्ते निर्मितीदरमयन भूमिगत कक्षांचा शोध लागला होता, परंतु अधिकाऱ्यांनी कक्ष संरक्षित करण्यासाठी ते पुन्हा बंद केले होते असे इस्तंबुल मेट्रोपॉलिटन म्युनिसिपालिटी महिर पोलाटकडून सांगण्यात आले. या ऐतिहासिक स्वरुपात महत्त्वपूर्ण आणि एकेकाळी आकर्षक चर्चच्या अवशेषांना पुन्हा प्रदर्शित केल्याने लोकांमध्ये याविषयी जागरुकता येईल असे किंग्स कॉलेज लंडनचे पुरातत्वतज्ञ केन डार्क यांनी म्हटले आहे.









