बेळगाव : अनगोळ येथील इंदिरानगर, शिवशक्तीनगर येथील रस्त्यावरील डेनेज चेंबर धोकादायक ठरू पहात आहे. अनगोळ चौथे रेल्वेगेटच्या बाजूला असलेल्या शिवशक्तीनगर, इंदिरानगर, चिदंबरनगर रस्त्यावर एक डेनेज चेंबरचे झाकण खराब होऊन मोडकळीस आले होते. त्यावर नवीन झाकण घालण्याची गरज आहे. अनगोळ, भाग्यनगर, चिदंबरनगर, मृत्युंजयनगर, विद्यानगर तसेच पूर्व भागातून वाहनचालक एस. व्ही. रोड गणपती मंदिर मार्गे इंदिरानगर येथून चौथ्या रेल्वेगेट मार्गे उद्यमबाग केएलई इंजिनिअरिंग कॉलेज, जीआयटी कॉलेज तसेच मजगाव आदी भागातून रिक्षाचालक, कारखानदार, विद्यार्थी यांची दिवसभर मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर वर्दळ असते. तसेच हा रस्ता अऊंद असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांना रस्त्याच्या कडेला आपली वाहने घेऊन पुढे जावे लागते.
पण गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावरील डेनेज चेंबरचे झाकण खराब झाले आहे. त्यावर नवीन झाकण घालण्याची गरज होती म्हणून नवीन झाकण व रिंग आणून त्यावर फक्त ठेवण्यात आले आहे. ते पूर्णपणे बसविण्यात आले नसल्याने चेंबरची रिंग व झाकण रस्त्यावर उंच तसेच ठेवण्यात आले आहे. दिवसा हे झाकण नजरेस पडत असले तरी रात्रीच्या वेळी अंधारात वाहनचालकांना याचा अंदाज येत नाही आहे. तर मोठ्या वाहनांच्या धक्क्याने ते झाकण कधी बाजूला जात असल्याने चेंबर उघड्यावर राहते तर चेंबरची रिंग उभी राहते. त्यामुळे डेनेज उघड्यावर रहात आहे. तसेच या ठिकाणी रहिवासी वस्ती असल्याने लहान मुले रस्त्यावर खेळत असतात. त्यामुळे अपघात घडण्याची शक्मयता आहे. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्यावरील डेनेज चेंबरचे झाकण योग्य पद्धतीने बसविण्यात यावे, अशी मागणी वाहनचालक व नागरीक करीत आहेत.









