फिनलंड हा देश दुसऱ्या क्रमांकावर
झोप ही मानवी आरोग्यासाठी महत्त्वाची असल्याचे मानले जाते. जर तुम्ही संतुति आहारासोबत पुरेशी झोप घेत असाल तर आजारांपासून दूर राहू शकतात. परंतु आता काळ बदलला आहे. सद्यकाळात लोक झोपेला कमी महत्त्व देतात असे अध्ययनात आढळून आले आहे. लोक सोशल मीडिया आणि मोबाइलवर वेळ घालविणे अधिक पसंत करतात. परंतु कुठल्या देशाचे लोक सर्वाधिक झोपतात हे तुम्हाला माहिती आहे का? जागतिक झोप सर्वेक्षणानुसार सर्वाधिक झोपणाऱ्या लोकांप्रकरणी नेदरलँड पहिल्या स्थानावर आहे. नेदरलँड्सचे लोक सरासरी 8.1 तास दरदिनी झोपत असतात. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर फिनलंड हा देश आहे. फिनलंडचे लोक दरदिनी सरासरी 8 तासांची झोप घेत असतात. तिसऱ्या क्रमांकावर संयुक्तपणे ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स हे देश आहेत. दोन्ही देशातील लोक प्रतिदिन 7.9 तासांची झोप पूर्ण करतात.
चौथ्या स्थानावर न्युझीलंड आणि ब्रिटन हे देश आहेत. दोन्ही देशांचे लोक सरासरी 7.8 तास झोपत असतात. तर पाचव्या स्थानावर कॅनडा आणि डेन्मार्क आहेत. या दोन्ही देशांचे लोक सरासरी 7.7 तास झोप घेत असतात. या यादीत अमेरिका 6 व्या क्रमांकावर असून तेथील लोक दरदिनी सरासरी 7.6 तासापर्यंत झोपतात. इटली आणि बेल्जियमचे लोक प्रतिदिन सरासरी 7.5 तासांपर्यंत झोपत असतात. तर स्पेन, जपान आणि दक्षिण कोरियाचे लोक दररोज 7.4 तासांची झोप पूर्ण करतात. ब्राझीलचे लोक प्रतिदिन सरासरी 7.3 तास झोपत असतात. या यादीत मेक्सिको 10 व्या क्रमांकावर तेथील लोक दरदिनी 7.3 तासांची झोप घेत असतात.









