ओटवणे प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी आपल्या व्यवसायाच्या कार्यबाहुल्यांमुळे संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे बुधवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या संघटनेच्या तातडीच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे प्रभारी अध्यक्ष म्हणून सावंतवाडी तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष संजय लाड यांची तर जिल्हा सहसचिवपदी समीर शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली.सावंतवाडीत श्रीराम वाचन मंदिर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला संघटनेचे जिल्हा सचिव दीपक पटेकर, जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बोर्डेकर, सावंतवाडी तालुका सचिव अस्लम खतिब, संघटनेचे कणकवली तालुकाध्यक्ष गुरुनाथ कुलकर्णी, वेंगुर्ला तालुका सचिव जयराम वायंगणकर, सावंतवाडी तालुका सहसचिव समीर शिंदे, सदस्य मनोज घाटकर, संदीप टोपले, सुभाष पुराणिक, सुभाष गोवेकर, परशुराम चव्हाण, दत्ताराम सडेकर, अमोल केसरकर, विजय ओटवणेकर, शैलेश कुडतरकर, चेतन वाळके सौ नेहा जोशी आदी पदाधिकारी सदस्य तसेच वीज ग्राहक उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेने मावळते अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी सर्वांच्या सहकार्याने गेले दीड वर्ष जिल्ह्यातील महावितरणची वीज व्यवस्था सुधारण्यासाठी अथक प्रयत्न केले. जिल्ह्यातील वीज ग्राहकांना आपल्या हक्काची अखंडित वीज पुरवठा होण्यासाठी प्रसंगी उपोषणे छेडली. तसेच तीन ते चारवेळा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोबत घेत त्यांनी रत्नागिरी, कोल्हापूर तसेच मुंबई येथील महावितरणच्या प्रतापगड कार्यालयावर धडक देत निवेदने देऊन जिल्हातील वीज समस्यां बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्यामुळे जिल्ह्यातील कामचुकार अधिकाऱ्याच्या बदल्या झाल्या आणि जिल्ह्याची वीज यंत्रणा नव्या जोमाने कामाला लागली. जिल्ह्यात रखडलेले कुडाळ तालुक्यातील आंब्रड सबस्टेशन त्याने आता प्रयत्न केल्याने मंजूर झाले असून काम प्रगतीपथावर आहे तर तळवडे सब स्टेशन मंजूर असून जागे अभावी थांबले आहे. यावेळी श्रीराम शिरसाट यांनी आपल्याला ग्राहकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार म्हणून आपण पदाचा राजीनामा दिला तरी कार्यकारिणीमध्ये यापुढेही कार्यरत राहणार आहे तसेच संघटनेच्या कामात सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. यावेळी संघटनेचे जिल्हा सचिव दीपक पटेकर यांनी संघटनेच्या आजपर्यंतच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर श्रीराम शिरसाट यांनीच सुचविल्या प्रमाणे सावंतवाडी तालुक्यात उल्लेखनीय काम केलेल्या संघटनेचे सावंतवाडी तालुक्याचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या संजय लाड यांची जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या प्रभारी अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









