आमदार असिफ सेठ यांच्याकडून पाठपुरावा
बेळगाव : शहरातील वंचित घटकांना परवडणाऱ्या दरात घर उपलब्ध करून देण्यासंदर्भात बेळगाव उत्तरचे आमदार असिफ उर्फ राजू सेठ यांनी गृहनिर्माण मंत्री जमीर अहमद खान यांच्यासोबत चर्चा केली. आर्थिकदृष्ट्या वंचित त्याचबरोबर अल्पसंख्याकांना घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राजीव गांधी वसती निगम योजना लागू करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. या अंतर्गत शहरात गृहनिर्माण प्रकल्प उभारून त्याद्वारे गरिबांना घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यासाठी आवश्यक जागा तसेच इतर बाबींविषयी आमदारांनी सविस्तर चर्चा केली. गृहनिर्माण मंत्री जमीर अहमद खान यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.









