सावंतवाडी
झाराप येथे जात असताना कुडाळ तालुक्यातील नानेली येथील दीपक विनायक सावंत (वय 19) या युवकाच्या दुचाकीला आकेरी येथे आयशर टेम्पोची धडक बसून तो गंभीर जखमी झाला . हा अपघात काल रात्री झाला असून सदर युवकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पलायन केले असून पोलिसांकडून शोधकार्य सुरू आहे. अपघातानंतर तेथील ग्रामस्थांनी रात्री प्राथमिक उपचारासाठी सदर युवकाला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्याच्या मेंदूला दुखापत झाल्याने गोवा – बांबुळी येथे अधिक उपचारासाठी त्याला हलविण्यात आले आहे . अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे राजेंद्र मसुरकर यांनी दिली आहे.









