वृत्तसंस्था/ चेंगडू (चीन)
येथे रविवारपासून सुरु झालेल्या आयटीटीएफच्या मिश्र सांघिक 2024 च्या मिश्र सांघिक विश्वचषक टेबल टेनिस स्पर्धेतील सलामीच्या लढतीत अमेरिकेने भारताचा 8-3 असा पराभव केला. या स्पर्धेसाठी भारताच्या नवोदित टेबल टेनिसपटूंना संधी देण्यात आली होती. तर मनिका बात्रा, श्रीजा अकुला, शरथ कमल आणि जी. साथियान यांनी या स्पर्धेत सहभागी न होण्याचे ठरविले होते.
भारत आणि अमेरिका यांच्यातील या सलामीच्या लढतीतील मिश्र दुहेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या नरेश नंदन आणि टिफेनी यांनी भारताच्या स्नेहीत सुरावजुला आणि पी. वैश्य यांचा 2-1 (10-12, 11-8, 11-4) अशा गेम्समध्ये पराभव केला. एकेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या सॅली मोलँडने भारताच्या यशस्वीनी घोरपडेचा 2-1 अशा फरकाने तसेच अमेरिकेच्या जेंगने भारताच्या जीत चंद्राचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. पुरुष दुहेरीत अमेरिकेच्या स्नेहीत आणि जीत चंद्रा यांना हार पत्करावी लागली. आता भारतीय टेटे संघाचा पुढील सामना यजमान चीनबरोबर सोमवारी खेळविला जाणार आहे.









