मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि शस्त्रs जप्त
वृत्तसंस्था/ पेशावर
पाकिस्तानी लष्कराची दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून लष्कर दहशतवाद्यांविरोधात मोहीम राबवत आहे. ताज्या प्रकरणात, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी शुक्रवारी खैबर पख्तुनख्वा प्रांतात दोन वेगवेगळ्या कारवाईत दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हेलिकॉप्टरने हल्ला केला. या काळात लष्कराने किमान 17 दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा केला आहे.
लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे बन्नू आणि उत्तर वझिरीस्तान जिह्यात ही कारवाई करण्यात आली. बन्नू जिह्यातील बाका खेल भागात हाफिज गुलबहादूर गटाच्या दहशतवाद्यांच्या अ•dयांवर हेलिकॉप्टरने केलेल्या हल्ल्यात सुरक्षा दलांनी 12 दहशतवाद्यांचा खात्मा केला. दुसरी कारवाई उत्तर वझिरीस्तानमधील मीर अलीच्या हसो खेल भागात करण्यात आली असून तेथे पाच दहशतवादी मारले गेले.
पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रs आणि दारूगोळा जप्त केला आहे. सुरक्षा दलांनी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची छायाचित्रेही जारी केली आहेत. सुरक्षा दलांच्या मदतीसाठी अतिरिक्त तुकड्या रवाना करण्यात आल्या असून कारवाई सुरू आहे. गेल्या काही आठवड्यांपासून पाकिस्तान दहशतवाद्यांविरोधात मोहीम राबवत आहे. अफगाणिस्तानला लागून असलेल्या भागात तालिबानी दहशतवादी गट सक्रीय झाल्यानंतर त्यांच्यावर पाकिस्तानी लष्कराकडून कारवाई केली जात आहे.









