नवी दिल्ली :
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँक (एसबीआय) यांच्याकडून देण्यात आलेल्या कर्जांमध्ये वार्षिक 14 ते 16 टक्क्यांची वाढ झाली आहे. बँकेजवळ जमा होणाऱ्या रक्केमत 10 टक्क्यांची वाढ राहिली आहे. हा आकडा पाहिल्यास आगामी आर्थिक वर्षापर्यंत एकूण बँकेचा व्यापार हा 100 लाख कोटींच्या घरात पोहोचणार असल्याचा दावा स्टेट बँकेचे अध्यक्ष सीएस शेट्टी यांनी केला आहे.
एसबीआयचे अध्यक्ष सीएस शेट्टी यांनी यावेळी विश्वासपूर्ण दावा केला आहे, की बँकिंग उद्योगामध्ये कर्ज वितरणांमधील वाढ काहीशी कमी राहिली असली तरी एसबीआय मात्र आगामी तीन वर्षांमध्ये वर्षाला 1 लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त करणार असल्याचेही म्हटले आहे.
सध्या बँकेने कर्ज वितरणात 14 ते 16 टक्क्यांची आणि जमा करण्यात 10 टक्क्यांचा अंदाज व्यक्त केला आहे. वृद्धीमधील आकडा पाहिल्यास यात मार्च 2026 पर्यंतचा व्यापार हा नवा आकडा प्राप्त करणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला आहे.









