रत्नागिरी :
शहरातील मिरकरवाडा या गजबजलेल्या मच्छीमार बंदरात पर्ससीन मासेमारी नौकेवरील स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलिंडरने अचानक पेट घेतला. यामुळे नौकेला आग लागली. परंतु हा सिलिंडर पाण्यात फेकण्यात आला. यामुळे आग आटोक्यात आली.
बुधवारी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास सारसी ही नौका खोल समुद्रात मासेमारी करुन मिरकरवाडा बंदरात
नांगरण्यात आली. खलाशी आपापली कामे आटपत होते. एवढ्यात त्या सिलिंडरने पेट घेतला. ४-५ खलाशांनी पाण्याच्या मदतीने आग आंटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अखेरीस सिलिंडर पाण्यात फेकण्यात आला. त्यामुळे आग आटोक्यात आली. मत्स्य व्यवसाय खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग लगोलग नियंत्रणात आल्याने नौकेचे कोणतेही नुकसान झाले नाही. तसेच जीवितहानीही झाली नाही. मोठी दुर्घटना टळली.








