कोल्हापूर :
येथील जयसिंगराव पार्क व यशिला पार्क दरम्यान बिबट्याचे दर्शन झाल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे. बिबट्याचे दर्शन घडून आल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.
बुधवारी रात्री 7.30 ते 7.45 च्या सुमारास जयसिंगराव पार्कच्या कमानीपासून हायवे चा रस्ता ओलांडून यशीला पार्क कडे बिबट्या जात असल्याचे एका नागरिकास दिसून आले आहे . दरम्यान, जयसिंगराव पार्क व यशीला पार्क परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता दक्ष रहावे व सदरचा बिबट्या कोणास दिसल्यास वन विभाग कोल्हापूर प्रादेशिक व कागल पोलीस ठाणे यांच्याशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे .
जंगलाचा ऱ्हास होऊन नागरी वस्ती वाढू लागल्याने वन्यप्राणी त्यांना अधिवास सोडून शहरी भागाकडे येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.








