बेळगाव : मध्यप्रदेश येथील भोपाळ येथील 20 व्या राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्वीमर्स व अॅक्वेरियस क्लबचे ज्येष्ठ जलतरणपटू इंद्रजित हलगेकर व लक्ष्मण कुंभार यांनी या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. इंद्रजित हलगेकर यांनी या स्पर्धेत 200 मी. फ्रिस्टाईल प्रकारात सुवर्ण, 50 व 100 बॅकस्टोकमध्ये कास्य पदक पटकाविले. लक्ष्मण कुंभार यांनी 50 मी. बटरफ्लायमध्ये रौप्य व 50 मी. बॅकस्टोकमध्ये कास्य पदक मिळविले. या दोन्ही जलतरणपटूंना प्रशिक्षक अक्षय शेरेगार, अजिंक्य मंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतीकर, इम्रान उचगावकर, उमेश कलघटगी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Previous Articleखडतर ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा ‘यशस्वी’ प्रारंभ
Next Article बाबुराव ठाकुर आंतरशालेय हॉकी स्पर्धेला प्रारंभ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









