कोल्हापूरः
कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेद्वार राजेंद्र लाटकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे.
यावेळी लाटकर म्हणाले, अपूर्व उत्साहात एक निर्णायक निकाल देण्याच्या इच्छेत कोल्हापूरकर आहेत. गेले अडीच-तीन वर्ष झुंडशाहीच्या कारभाराला कंटाळले होते, त्यातून मुक्ततेसाठी या लोकशाहीच्या उत्सवात कोल्हापूरकर मोठ्या संख्येने, उत्साहात बाहेर पडत आहेत. माझ्यासारख्या शिक्षकाचा मुलगा एक सामान्य कार्यकर्त्याला फार मोठ पाठबळ कोल्हापूरकरांनी दिले आहे. मी या ऋणातून मुक्तच होऊ शकत नाही. मला सकाळपासून लोक भेटून सांगत आहेत साहेब गुलाल आपलाच आहे.








