सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी आपला मतदानाचा हक्क चराठा येथील अटल प्रतिष्ठान शाळेमध्ये सकाळी ७ वाजता बजावला. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी सौ.. वेदिका यांनीही मतदानाचा हक्क बजावला. यावेळी अपक्ष उमेदवार विशाल परब म्हणाले, गेले सहा महिने मी ही लढाई लढण्यासाठी उतरलो आहे. सर्वांनी मला चांगली साथ दिली. त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो. मी माझ्या मतदानाचा हक्क बजावला आहे. तुम्हीही मतदान करा असे आवाहन त्यांनी केले.









