कोल्हापूर :
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून त्यासाठी मतदान केंद्र निर्मितीची प्रक्रिया सुरु झाली आहे. जिह्यामध्ये एकूण 10 मतदारसंघात मतदान टक्केवारी वाढीसाठी विविध संकल्पना घेवून 143 थिमॅटिक मतदान केंद्रांची निर्मिती नियंत्रण अधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या नियंत्रणात करण्यात येत आहे.








