वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने इंडिगो आणि एअर इंडिया या प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्यांनी पुढील सूचनेपर्यंत बाली येथे जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. इंडोनेशियाच्या पूर्व नुसा तेंगारा प्रांतातील एका बेटावर हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे धूर, राख आणि पाण्याची वाफ यांचे लोट उसळत आहेत. परिणामी, बऱ्याच मोठा भाग धूरमय झाला असल्याने विमान उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.









