श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी 5.2 तीव्रतेचा भूकंप जाणवला आहे. तर या भूकंपाच्या धक्क्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवित तसेच आर्थिक हानी झाली नसल्याचे इंडियन मेट्रोलॉजिकल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानात होते. भूकंप सकाळी 10 वाजून 43 मिनिटांच्या आसपास जाणवला आहे. तर काश्मीर खोऱ्यात भूकंपाचे धक्के जाणवल्यावर लोकांमध्ये दहशत फैलावली आणि त्यांनी घराबाहेर धाव घेतली. पाकिस्तानच्या काही हिस्स्यांमध्येही भूकंप जाणवला आहे.









