घरोघरी जात मागत आहेत समर्थन
वृत्तसंस्था/ फूलपूर
समाजवादी पक्षाच्या आमदार पूजा पाल या उत्तरप्रदेशातील फूलपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी प्रचार करत आहेत. कौशांबी जिल्ह्dयातील चायल मतदारसंघाच्या आमदार असलेल्या पूजा पाल या फूलपूर मतदारसंघात भाजप उमेदवार दीपक पटेल यांच्याकरता प्रचार करताना दिसून आल्या आहेत. फूलपूर मतदारसंघात सपच्या वतीने मुज्तबा सिद्दीकी उमेदवार आहेत.
पूजा पाल यांनी मतदारसंघातील घरोघरी जात भाजप उमेदवारांसाठी मतयाचना केली आहे. पूजा पाल यांनी यापूर्वी राज्यसभा निवडणुकीत सप उमेदवाराच्या विरोधात मतदान केले होते. पूजा पाल या माजी आमदार राजू पाल यांच्या पत्नी आहेत. राजू पाल यांची 2004 च्या निवडणुकीपूर्वी हत्या करण्यात आली होती.









